बीज अंकुरे मनात जावे वाटे सहलीस
सांगे मित्र मैत्रिणींस तयारीस लागे खास ll
करुनिया चर्चा फार ठिकाण ठरले केरळ
टूर उस्ताद मदतीस बॅग भरावी केवळ ll
थंडी असे तेथे फार शाल घेतली म्हणून
गरम पाणी पिण्यासाठी थर्मास ठेवले भरून ll
सोबतीला घेते खाऊ लाडू आणि शंकरपाळी
लता देणार आहे आम्हा पुरणपोळीची हो थाळी ll
बघुनिया वॉटरफॉल हुंदडती आनंदात
शीण गेला हो निघून प्रवासाचा क्षणार्धात ll
इको पॉईंटवर फोटो काढण्यात दंग सारे
कथकली नृत्य पाहून सारे म्हणती वाह ! रे ll
चहाच्या मळ्यात जाता मनी आनंदाची भरती
इथे जाऊ तिथे जाऊ थोर सारे सान होती ll
जटायू अर्थ सेंटर पाहण्या आठशे सव्वीस पायऱ्या चढती
उतरताना वेलीवरच्या झोपाळ्यावर सारे झुलती ll
पद्मनाभस्वामी मंदिरात रांगेत उभे दोन तास
पालखीच्या दर्शनाने चिंता गेल्या हो लयास ll
स्वामी विवेकानंदांच्या पद स्पर्शाने पुनित
खडकावर टेकवून माथा सारे होती शांत शांत ll
पाहून त्रिवेणी संगम मन आले हो भरून
घेऊन ओंजळीत जल केले पूर्वजांचे स्मरण ll
खाद्यपदार्थांची रेलचेल, राहण्याची हॉटेल सुंदर
प्रवासासाठी आरामदायी बस,टूर उस्ताद एक नंबर ll
पाचुसम केरळ भूमी डोळ्यात साठवून ठेवून
नवी नाती सोबतीला आलो घरी घेऊन ll
सुजाता टिकले
कलमठ,कणकवली
सिंधुदुर्ग,महाराष्ट्र
९४२२६३२६५२
Comments (0)